Ad will apear here
Next
वंचित विकास संस्थेतर्फे वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान
पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) सुनीता जोगळेकर, विजयकुमार मर्लेचा, मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले.

पुणे : ‘नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या सोहळ्याचे आयोजन आले आहे,’ अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनिता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विजयकुमार मर्लेचा म्हणाले, ‘रविवारी, १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात हा सन्मान सोहळा होणार आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर मिलिंद तुंगार, सूरज मांढरे व ब्रिगेडियर रघुनाथ जठार हे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानचिन्ह, श्रीफळ व पुष्प असे या सन्मानाचे स्वरुप आहे.’

मीना कुर्लेकर म्हणाल्या, ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या, सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. एकूण ५६ वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांच्या गायनाचा कार्यक्रमही या वेळी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZSRBY
Similar Posts
‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ पुणे : ‘भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये;तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे;पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे,’ असे उद्गार सैन्यदलासाठी काम करणाऱ्या महिलांनी काढले.
जवानांना पत्र पाठवून पाठिंबा पुणे : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर प्राण हाती घेऊन देशाची सुरक्षा करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील काही नागरिकांनी सैनिकांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जवानांना दर वर्षी राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या डॉ
एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा पुणे : हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. या वेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राध्यापकवर्ग, एन. सी. सी. छात्र व विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले
शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख पुणे : सीमेवर कोणी जवान धारातीर्थी पडला, की सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या संतापाचे, चर्चेचे प्रमाण मोठे असते; मात्र प्रत्यक्ष काही कृती करण्यासाठी, मदतीसाठी पुढे येणारे हात तुलनेने कमी असतात. पुण्याच्या कोथरूड भागातील नव अजंठा अॅव्हेन्यू या सोसायटीतील नागरिकांनी मात्र आपल्या कृतीतून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language